खेडेगावात सर्रास पहिली वापरली जाणारी खाट म्हणजे गरीबांचा पलंगच. हिच झोपण्याची खाट जर तुम्हाला कोणी ६४ हजाराला सांगितली तर तुमची झोप उडेल. कदाचित त्याला वेड्यात काढाल. पण असा प्रकार ऑस्ट्रेलियामध्ये घडला असून डॅनिअल नावाच्या एका विक्रेत्याने चक्क ९९० डॉलर म्हणजे जवळपास ६४ हजार रुपयांहून अधिक किंमतीला काही खाटा विक्रीसाठी काढल्या आहेत. पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करता करता आपल्या लोकांनी खाटेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. पण डॅनिअलने पारंपरिक खाटेची अशी काही जाहिरातबाजी केली आहे की, सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसेल.
डॅनिअल हा आयफोनपेक्षाही अधिक किंमतीत खाटेची विक्री करत आहे. ‘हे पारंपरिक आसन असून, महागड्या पण मजबूत आणि टिकाऊ लाकडाचा वापर करुन ते तयार करण्यात आले आहे. ही खाट वापरासाठी अधिक सोयीस्कर आणि आरामदायी आहे.’ अशा एकापेक्षा एक लक्षवेधी ओळी वापरून त्याने खाटेची जाहिरात केली आहे.